---Advertisement---
वाणिज्य

ग्राहकांचा खिसा खाली होणार! सोने लवकरच 60 हजार रुपयांची पातळी ओलांडणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशातच मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीने आपला अडीच वर्षाचा जुना रेकॉड तोडून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. यामुळे ग्राहकांना अधिकच भुदंड बसत आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना त्यात बाजारातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. पण भाव आणखी खाली येतील का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

gold jpg webp webp

शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 614 रुपयांची घसरण झाली. यासोबतच सोन्याचा भाव 56,800 रुपयांवर होता. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोने लवकरच 60 हजार रुपयांची पातळी ओलांडणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. अशा स्थितीत सोन्याची मागणीही वाढणार आहे.

---Advertisement---

सध्या विक्रमी उच्चांकापेक्षा सोने जवळपास 2,000 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. काही दिवसापूर्वी सोन्याचा भाव 58,847 रुपये या उच्चांक पातळीवर गेला होता.

जेव्हापासून अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केली आहे, तेव्हापासून डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरातही घसरण झाली. याचा परिणाम असा झाला की मार्च 2022 मध्ये 1950 डॉलर प्रति औंस या उच्चांकावरून सोने ऑक्टोबर 2022 मध्ये 1636 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले होते, परंतु जेव्हापासून फेडने व्याजदरात नरमाई आणली आहे, तेव्हापासून सोन्यामध्ये तेजी दिसून आली आहे. अशा स्थितीत डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या दरात ही घसरण दिसून येत असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, जर आपण देशांतर्गत बाजाराबद्दल बोललो तर, दिवाळीच्या वेळी सोन्याचा भाव 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली होता आणि आता त्यात तेजी दिसून आली आहे.

मंदीत सोने वधारले?
डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. फेड आणखी 0.25 टक्के दर वाढवेल. याशिवाय पाश्चात्य देशांतील मंदीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही आहे खरेदीची योग्य वेळ
सोन्याचा भाव 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिर असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, जर सोन्याची किंमत यापेक्षा कमी झाली आणि 55,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली, तर सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ असेल. सोने लवकरच 60 हजार रुपयांची पातळी ओलांडणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---