जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या भागात सातत्याने चढ-उतार दिसून आला. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरणीला ब्रेक लागला असून सोने आणि चांदीच्या (Silver Rate) भावात वाढ झाली आहे. आज सोमवारी जळगावात सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव 710 रुपयाने वाढवला आहे. तर चांदी 530 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी शनिवारी सकाळच्या सत्रात सोने ७० रुपयांनी घसरले होते तर चांदी ४६० रुपयांनी महागली होती.
आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. इतर बँकांनी व्याजदर वाढवल्याने कर्जदारांना जोरदार झटका बसला आहे.
गेल्या आठवड्यात सोने तीन वेळा स्वस्त दोन वेळा महागले आहे. तर चांदी चार वेळा स्वस्त तर एक वेळा महागली आहे. चार दिवसात सोने जवळपास १०० रुपयांनी महागले होते. दुसरीकडे चांदी ९०० रुपयांनी घसरली होती. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. चांदी देखील ३०० ते ३५० रुपयांपर्यंत महागली आहे.