जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । सोने चांदी दरात चढ उतार सुरु असून जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं. काल म्हणजे सोमवारी सोन्याचे भाव घसरले होते. तर आजही सोन्याचा भाव कमी झाला आहे. Gold Silver Rate today

Good returns वेबसाईटनुसार, आज मंगळवारी सोन्याचे दर घटले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६५० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. यांनतर २४ कॅरेट १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ८२,४०० एवढा आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी ८९,८९० रुपये इतका आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत सोने चांदी दरात मोठी घसरण
अमेरिकन सरकारने टेरीफ लागू केल्यापासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच आहे. दि. १ एप्रिलपासून ७ एप्रिलपर्यंत चांदी तब्बल १२ हजार, तर सोने दोन हजार ८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी (७एप्रिल) सोने भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ८८ हजार ८०० रुपये प्रति तोळा तर चांदीत ८०० रुपयांची घसरण होऊन ती ८९ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली.