जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२५ । सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचा ट्रेंड सुरूच आहे. आज म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात जवळपास ३८० रुपयांनी वाढ झाली आहे. ऐन गणेशोत्सवात सोन्याचा दर जीएसटी विना लाखाच्या वर गेल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. दरम्यान आज चांदी दर स्थिर आहे. चांदी दरात कुठलाही बदल झाला नाहीय.

खरंतर गणेशोत्सवात अनेकजण सोने खरेदी करतात. ज्यांच्या घरात गणपती बसतात ते गणपती बाप्पाासाठी सोने खरेदी करतात. परंतु गणेशोत्सवाच्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत.

२४ कॅरेट सोन्याचे दर
आज बुधवारी २७ रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर १,०२,४४० रुपये आहेत. या दरात ३८० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८१,९५२ रुपये आहेत या दरात ३०४ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ३८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १०,२४,४०० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ३५० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळा सोन्याचे दर ९३,९०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७५,१२० रुपये आहेत. या दरात २८० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ९,३९,००० रुपये आहेत. या दरात ३५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचा दर
चांदी दर मागच्या दोन तीन दिवसापासून स्थिर आहे. आज एक किलो चांदीचा दर १,२०,००० रुपये इतका आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या निर्णयाचा परिणाम थेट सोन्याच्या बाजारावर दिसून आला असून, किमतींमध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.












