सराफ बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण; जळगावमध्ये आताचा दर काय?

जुलै 13, 2026 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२६ । एकीकडे अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे देशातील सराफा बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण नोंदवली गेली

gold silver jpg webp

आज, १३ जुलै रोजी सकाळच्या सत्रात देशातील प्रमुख शहरांसह सुवर्णनगरी जळगावमध्येही सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात आज सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १४२० रुपयांची घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति तोळा १,४२,९१० रुपयावर पोहोचला आहे. तर आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १३०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३१,००० रुपये खर्च करावे लागतील.त्याचबरोबर १८ कॅरेटचं सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १०७० रुपयांनी घसरून १,०७,१८० रुपयावर पोहोचले आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या दिसणारी घसरण ही अल्पकालीन असू शकते. जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाई आणि भूराजकीय घडामोडी लक्षात घेता दीर्घकालीन दृष्टीकोनातून सोन्याच्या किमती पुन्हा मजबूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now