नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी वाढ; खरेदीदारांना झटका, नवीन दर काय?

एप्रिल 1, 2026 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२६ । आज, १ एप्रिल रोजी, नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दराने जोरदार झेप घेतली आहे. गेल्या काही दिवसांत इराण–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. मात्र आता परिस्थितीत बदल होत असून सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ दिसून येत आहे.

gs1april

आज बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. goodreturns संकेतस्थळानुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल १,९७० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदी दरात तब्बल ५००० हजाराची वाढ झाली. दरम्यान, अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे.

काय आहे सोन्याचा भाव?

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १९७० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ₹१,५१,४८० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १८०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ₹१,३८,८५० आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १४८० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ₹१,१३,६१० रुपायांवर पोहोचला आहे.

चांदीचा भाव?

सोन्यासह चांदी दरातही मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी चांदी दरात ५००० रुपयांची वाढ झाली. यांनतर चांदीचा एक किलोचा भाव २,५५,००० रुपयावर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात चांदी १०००० रुपयांनी वाढली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now