---Advertisement---
जळगाव जिल्हा सोने - चांदीचा भाव

Gold Rate : विक्रमी पातळीवरून सोन्याचा भाव आला खाली, जळगावच्या सुवर्णपेठेत 24 कॅरेटचा भाव काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून आली. यामुळे देशात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक पातळी गाठली. एकीकडे लग्नसराई सुरु असताना त्यातच सोन्यासह (Gold Rate) चांदीच्या किमतीने विक्रमी पातळी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा घाम फुटला आहे. दरम्यान काल अचानक सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. यामुळं ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला. Jalgaon Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

काय आहेत आज भाव?
जळगाव सराफ बाजारात बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६०० रुपयाची घसरण झाली. यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विनाजीएसटी ८५,५०० (जीएसटी ८८,०६५) रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला. यामुळे सध्या चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९७००० रुपये इतका आहे.

---Advertisement---

सध्या सोना चांदीच्या विक्रमी दरामुळे सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली. सर्व कारणांमुळे सोन्या चांदीच्या दराने विक्रम केल्याचा दावा सराफा व्यावसायिकांनी केला आहे. सोन्याचा दर 90 हजारांचा चांदीचे दर एक लाखांचा आकडा पार करेल अशी शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---