---Advertisement---
जळगाव जिल्हा सोने - चांदीचा भाव

Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा दर पुन्हा ऐतिहासिक पातळीवर ; गेल्या 24 तासात झाली मोठी वाढ

gs11 feb
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२५ । रशिया-युक्रेन युद्ध आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे व्यापारी धोरणामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवरही दिसून आला आहे. जळगाव सराफ बाजारात सोने (Gold Rate) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून यामुळे सोन्याने आतापर्यंत उच्चांकी दर गाठला आहे. Gold Silver Rate Today

gs11 feb

काय आहे भाव?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत १००० हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे आता सोन्याचा दर प्रथमच विनाजीएसटी ८६,२०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले आहे. तर जीएसटीसह सोने ८८,७८० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी दरात २०० रुपयाची वाढ झाल्याने एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९७२०० रुपयापर्यंत पोहोचले आहे.

---Advertisement---

 जळगाव सराफ बाजारात यावर्षी १ जानेवारीपर्यंत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६,८०० रुपये इतका होता. तर चांदीचा दर ८८००० रुपयावर होता. मात्र यांनतर आतापर्यंत सोन्याचा दर ९४०० रुपयापर्यंत तर चांदीचा दर ९००० ते ९४०० रुपयापर्यंत वाढला आहे. सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव एक लाख रुपयांवर शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---