⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सोने किंचित महागले, चांदी घसरली ; आजचा नवीन भाव पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत आहे. आज आठवड्याच्या चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झालेली दिसून आली. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा सोने-चांदीचा दर?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10.30 पर्यंत सोने किंचित 13 रुपायांनी वाढले वाढले आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 57,228 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीची किंमत किंचित 40 रुपयांनी घसरली असून यामुळे चांदी 67,596 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगावातील दर
जळगाव सवर्णनगरीत सोने आणि चांदीचा दर स्थिर आहे. आज 22 कॅरेट सोने 52,700 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर 69000 रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तर तपासाच पण त्यासंबंधित कोणतीही तक्रार तुम्ही करू शकता.

रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्स किंवा ०.२५ टक्क्यांनी वाढ केली जात आहे. RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर पुढील कर्ज घेणे अधिक महाग होईल. चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) 6 पैकी 4 जणांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने सहमती दर्शवली होती. दास यांच्या मते, FY24 मध्ये चलनवाढीचा दर 4 टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज आहे. ते म्हणाले की, मे 2022 पासून जारी करण्यात आलेल्या व्याजदरातील वाढीचा परिणाम हळूहळू दिसून येत आहे.