सोमवार, सप्टेंबर 25, 2023

आज सोने आणि चांदी पुन्हा महागली ; पहा आताच काय आहे दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । युरोपियन देशात सध्या मंदीचे वारे असून त्याचा अनुकूल परिणाम डॉलरमध्ये दिसत आहे. तर प्रतिकूल परिणाम सोने-चांदीत दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारातील चमक आज (शुक्रवार)ही कायम आहे. दोन्ही धातूंचे भाव हिरव्या चिन्हाने उघडले.

आज सोन्याच्या किमतीत 0.24 टक्क्यांनी म्हणजेच 140 रुपये प्रति दहा ग्रॅम वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांनी म्हणजेच 300 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,386 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,330 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर चांदीचा भाव वाढीनंतर 72,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने 0.21 टक्क्यांनी म्हणजेच 125 रुपयांच्या वाढीसह 59,123 रुपयांवर उघडले. जेव्हा चांदीची किंमत 0.46 टक्के म्हणजेच 328 रुपयांच्या वाढीसह 72,098 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54,500 रुपयावर गेला आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,500 रुपायांवर आहे. यापूर्वी सोन्याचा दर 60000 रुपयावर होता. त्यात घसरण झालेली दिसून येतेय. त्याचप्रमाणे सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 72,900 रुपयांवर आला आहे. गेल्या तीन चार दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल दोन ते तीन हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचा दर 75 हजारांवर गेला होता.