सोन्याचा भाव 51 हजाराच्या उंबरवठ्यावर, वाचा आजचा 10 ग्रॅमचा भाव

नोव्हेंबर 8, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । सोने आणि चांदीचे किमतीत चढ-उतार सुरूच आहे. आज व्यवहाराच्या आठवड्याचा दुसरा दिवस असून आज सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये किंचित बदल झाला आहे. मात्र सततच्या दरवाढीने वायदे बाजारात सोन्याचा भाव 51 हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. सध्या तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त, समारंभांना तसेच इतर शुभ कार्याला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने ग्राहकांची बाजारपेठांत लगबग पाहायला मिळते. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

आज, वायदे बाजारात आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव किंचित 10 रुपयांनी वाढून 50,925 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर दुसरीकडे आज चांदीचा दर 15 रुपयांनी वाढून 60,855 रुपयांवर आला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 51000 रुपायांवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव 60,000 वर गेला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now