जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतेय. आज शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल ५९० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या एक किलोग्रॅम भावात १८६० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी सोन्याच्या भावात ८० रुपयाची नोंद झाली होती तर चांदीच्या भावात किंचित २० रुपयाची वाढ झाली होती. दरम्यान, देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले असून यामुळे पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात सोन्याच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
आजचा जळगावातील भाव :
जळगाव सराफ बाजार पेठेत आज शुक्रवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५६० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६१,८४० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
देशभरात कोरोनाने (Corona Virus) पुन्हा डोकंवर काढलं असून यामुळे पुन्हा लॉकडाउन(Lockdown) लागण्याची शक्यता गडद बनली आहे. त्याचे पडसाद सराफ बाजारावर दिसून येतोय. जळगाव सराफ बाजारात गेल्या पाच दिवसात सोने ३ वेळा महागले आहे. तर दोन वेळा स्वस्त झालं आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ५०० रुपयांहून अधिकने घसरण झाली आहे. तर चांदी दरात २१०० रुपयाची घसरण झाली आहे.
ओमिक्रॉनचं सावट, 55 हजारांचा टप्पा!
ओमिक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव, फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ, डॉलरचा सावरलेला भाव, कच्चा इंधनाच्या भावांतील चढ-उतारांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर जाणविण्याची शक्यता असल्याचे कमोडिटी मार्केटच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणारी वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,000 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.
या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
०३ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१३० रुपये असा होता. ०४ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,१९० रुपये इतका नोंदविला गेला. ०५ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६८० रुपये इतका नोंदविला गेला. ०६ जानेवारी (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७०० रुपये इतका नोंदविला गेला. तर आज शुक्रवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५६० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६१,८४० रुपये इतका आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
हे देखील वाचा :
- बाबो..! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; भाव आणखी वाढणार का?
- सोन्याने घेतली उंच भरारी, चांदी देखील महागले,बघूया काय आहेत आजचे भाव…
- बोंबला! आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सोने चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेकडे.. आताचे भाव पाहिलेत का?
- ग्राहकांना दिलासा! सोने चांदी पुन्हा घसरली..आता कुठपर्यंत आले दर??
- आजचा सोने चांदीचा भाव ; कुठपर्यंत आला दर? तपासून घ्या