---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य सोने - चांदीचा भाव

Gold Silver Rate : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा भाव पुन्हा घसरला, चांदीची झाली स्वस्त; पहा आताचे भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी सोने दरात २०० रुपये प्रति तोळ्यापर्यंतची घसरण झाली. तसेच चांदी दरात देखील १००० रुपयाची घसरण झाली. तुम्ही जर आज खरेदीला जात असाल तर त्यापूर्वी आताचे लेटेस्ट दर तपासून घ्या..

gold silver jpg webp

गेल्या आठवड्यात देखील सोने स्वस्त झाले होते. मात्र या सोमवारी आणि मंगळवारी सोन्याने मोठी झेप घेतली. या दोन दिवसात १५०० रुपयांनी सोने महागले होते. मात्र, त्यानंतर सलग तीन दिवसांपासून घसरण सुरु आहे. बुधवारी ४०० रुपयांनी, गुरुवारी शंभराने तर शुक्रवारी २०० रुपयांनी सोने खाली आले.

---Advertisement---

आता काय आहेत भाव?
आज सकाळच्या सत्रात जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८६५०० रुपये (जीएसटीसह ८९१००) तोळा इतका आहे. तर चांदीचा दर विनाजीएसटी ९९००० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सोने दरातील ही घसरण बाजारातील करेक्शन असल्याचे जाणकार मानतात. येत्या पंधरवड्यात सोने दरात पुन्हा तेजी येऊ शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment