⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | वाणिज्य | आनंदवार्ता ! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचा प्रति तोळ्याचा भाव पहा..

आनंदवार्ता ! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचा प्रति तोळ्याचा भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । सोने-चांदीच्या किंमतींनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता आणली आहे. सोने दरात प्रति तोळा ४०० रुपयांची घसरण दिसून आली. तर चांदी दरात ५०० रुपयाची घसरण झाली. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा ६३ हजार रुपयावर आला आहे. दरात घसरण झाल्याने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला. Gold Silver Rate 6 February 2024

डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याने कमाल वाढ नोंदवली होती. या विक्रमानंतर या नवीन वर्षात सोन्याला भरारी घेता आली नाही. जानेवारीत सोने २००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आणि त्यात वाढ पण झाली. फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही दरवाढ कायम होती.

१ फेब्रुवारी रोजी सोने १०० रुपयांनी तर २ फेब्रुवारीला २०० रुपयांनी भाव वधारले. तर ३ फेब्रुवारी रोजी किंमतीत ४०० रुपयांची वाढ झाली. ५ फेब्रुवारी रोजी ३०० रुपयांनी भाव उतरले. त्यामुळे आता जळगावच्या सुवर्णनगरीत २२ कॅरेट सोने ५७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६३,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

दुसरीकडे मागील पाच दिवसात चांदी दरात १००० रुपयांची घसरण झाली. जळगावात १ फेब्रुवारीला चांदीचा एक किलोचा भाव ७३००० रुपये विनाजीएसटी विकला जात होता. तो आज ७२००० रुपयावर पोहोचला आहे. काल चांदीच्या दरात ५०० रुपयाची घसरण झालेली दिसून आली.

MCX वर सोन्या-चांदीची किंमत
आज भारतीय बाजाराबरोबरच परदेशी बाजारातही घसरणीचा काळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी बाजार लाल चिन्हाने उघडला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने 0.13 टक्क्यांनी म्हणजेच 81 रुपयांच्या घसरणीसह 62,235 वर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव येथे 0.13 टक्क्यांनी घसरून 90 रुपयांनी 70,390 रुपये प्रति किलो झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.