जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२४ । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्यासह चांदीच्या दराने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व रेकॉर्ड तोडले. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला पण ही घौडदौड कायम होती. पण गेल्या दोन तीन दिवसांत सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारातही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. Gold Silver Rate 5 January 2024
दोन दिवसात सोने जवळपास 800 रुपयांहून अधिकने घसरले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.
जळगावातील दर :
जळगावच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 58,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 74000 रुपयावर आला आहे. दरम्यान जळगावात गेल्या दोन दिवसात सोन्याचा दर 850 रुपयांनी घसरला आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 64,150 रुपयावर विकला जात होता. दुसरीकडे चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली.