⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या किमतीवर ओमिक्राॅनचा परिणाम, वाचा आजचा भाव

Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या किमतीवर ओमिक्राॅनचा परिणाम, वाचा आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । देशात ओमिक्राॅनमुळे (Omicron) कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागल्याने कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात चढ-उतार सुरु आहे. जळगाव सराफ बाजारात काल मंगळवारी दोन्ही धातूंच्या किमतीत घट झाली असता आज पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.(Gold Silver Price Today)

जळगाव सराफ बाजार पेठेत आज बुधवारी १० ग्रॅम सोन्याच्या दरात २४० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ४९० रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,०७० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,६८० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनचा वाणिज्य आणि व्यवसायिक जगावर देखील परिणाम होत आहे. तज्ज्ञांची अशी खात्री आहे की या नव्या व्हेरिएंटचा असा परिणाम होईल की, सोन्याचे दर $1835 च्या पातळीवर ढकलले जातील. सध्याच्या पातळीपेक्षा हा दर सुमारे 2% जास्त आहे. वाढलेले निर्बंध, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे परिणाम यामुळे सोन्याच्या मागणीला आणखी वेग येईल. यावर्षी २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

जळगाव सराफ बाजारात देखील सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने आणि चांदीच्या वाढ दिसून आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. परंतु आज पुन्हा दोन्ही धातूंमध्ये वाढ झाली आहे. काल मंगळवारी सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर दुसरीकडे चांदी ९४० रुपयांनी स्वस्त झाली होती.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२७ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये असा होता. २८ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये इतका नोंदविला गेला. २९ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,९८० रुपये इतका नोंदविला गेला. ३० डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२९० रुपये इतका नोंदविला गेला. ३१ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.