⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदीच्या दरवाढीने तोडले सगळे रेकॉर्ड ; पहा जळगावच्या सुवर्णपेठेतील आताचे भाव..

सोने-चांदीच्या दरवाढीने तोडले सगळे रेकॉर्ड ; पहा जळगावच्या सुवर्णपेठेतील आताचे भाव..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने दरवाढीचा बिगूल वाजवला असून आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तुटले. दरम्यान,सुवर्णपेठ जळगावमध्ये सोने दरात काल (४ एप्रिल) च्या सकाळच्या किमतीपेक्षा ३०० रुपयाची वाढ दिसून आलीय. सोबतच चांदी १००० रुपयांनी महागली आहे. यामुळे विनाजीएसटी सोन्याचा भाव ७० हजार रुपयांवर तर जीएसटीसह सोने ७२ हजार रुपयावर गेलं आहे. त्यामुळे सराफा बाजारात यावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला.

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६८६०० रुपये होता.तर चांदी विनाजीएसटी ७६००० रुपये प्रति किलोवर होती. मात्र अवघ्या चार दिवसांत सोने आणि चांदीने गेल्या चार महिन्यातील सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. गेल्या चार दिवसांत सोने १६०० रुपयांनी तर चांदीने ३००० रुपयापर्यंतची मजल मारली.

आजचा भाव :
सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६४,१२० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोनं ७०,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तसेच ३ टक्के जीएसटी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२१०० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ७९००० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. तर जीएसटीसह चांदी ८१३७० रुपयांवर पोहोचली.

सध्या सोने दराची ७५ हजार प्रति तोळ्याकडे वाटचाल सुरू आहे ही दरवाढ आंतरराष्ट्रीय सोने बाजारात मागणी वाढल्याचा परिणाम अभ्यासक मानतात. गेल्या महिन्यात सोन्याने तीन वेळा उच्चांकी दर पातळी गाठली होती. तर या महिन्याच्या पहिल्याच तारखेला पुन्हा उच्चांकी पातळी गाठून ६८६०० रुपयांवर पोहोचले होते. आता सोने जीएसटीसह ७२१०० रुपये तोळ्यावर गेले आहे. चांदीनेही गेल्या महिन्यात दोन वेळा व या महिन्यात एकदा असे उच्चांकी दर प्रस्थापित केले होते. चांदी पुन्हा गुरुवारी एक हजारांची उसळी मारून ७९ हजार रुपये किलो झाल्याचे समोर आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.