⁠ 
बुधवार, मे 8, 2024

सोने पुन्हा कडाडले, चांदीची महागली ; आता एका ग्रॅमसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे??

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने सोन्या-चांदीचे भाव वाढू लागले आहेत. सोमवारी भारतीय सराफा बाजार हिरव्या चिन्हाने उघडला. यादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्या-चांदीचे भाव प्रत्येकी 120 रुपयांच्या वाढीसह उघडले. यानंतर बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,743 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,720 रुपये प्रति दहा ग्रॅम असेल.

त्याचवेळी चांदीचा भाव 120 रुपयांनी वाढून 75,090 रुपये प्रति किलो झाला. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने 0.23 टक्क्यांनी म्हणजेच 135 रुपयांच्या वाढीसह 59,530 रुपयांवर ट्रेंड करू लागले. तर चांदीची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढून 126 रुपयांनी वाढली आणि 75,215 रुपये प्रति किलोवर ट्रेंड सुरू झाली.

जळगावमधील सोने चांदीचा दर?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्यासह चांदीच्या किमतीने पुन्हा उसळी घेतली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी 60 हजाराखाली आलेला सोन्याचा दर पुन्हा वाढला आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 54,900 रुपयावर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 60000 रुपयावर गेला आहे. सोबतच चांदीचा दर विनाजीएसटी 75,000 रुपये प्रति किलो इतका आहे.