⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | सोन्यातील तेजीला अखेर ब्रेक ; आज सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा नवे दर

सोन्यातील तेजीला अखेर ब्रेक ; आज सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । सगल तीन सत्रात महागलेल्या सोन्यातील तेजीला अखेर ब्रेक बसला. आज गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोबतच चांदीच्या भावातही घसरण झाली आहे. आज सोने ९० रुपयांनी तर चांदी ४८० रुपयांनी स्वस्त झाली. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने १७० रुपयांनी महागले होते. तर चांदी ४२० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,९२० रुपयांपर्यंत खाली आला. तर एक किलो चांदीचा भाव ६०,४५० रुपये इतका आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.

या आठवड्यात सोने भावात सलग तीन दिवस वाढ झाली. या तीन दिवसात सोन्याचा भाव जवळपास २५० रुपयांनी वाढले. तर दुसरीकर सलग दुसऱ्या दिवस चांदीच्या भावात घसरण झाली आहे. या दोन दिवसात चांदी ९०० रुपयांनी घसरली आहे.

सोने विक्रमी उच्चांकावरून ४३०० खाली आले
यावेळी सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा ४३०० पेक्षा जास्त स्वस्त आहे. सोन्याचा भाव 56,200 च्या पातळीवर पोहोचला होता, तर सध्या सोन्याचा भाव ५१,९२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

सोन्याचा भाव वाढू शकतो
तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रशियाने जी 7 देशांमध्ये सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, त्यानंतर बाजारात सोन्याचा पुरवठा कमी होईल आणि मागणी वाढेल. खरतर रशिया हा सोन्याचा मोठा निर्यातदार देश असून तिथून होणारी आयात थांबवल्याचा परिणाम भारतासह जगभरातील बाजारपेठांवर होणार आहे. आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२७ जून २०२२- रुपये ५१,८१० प्रति १० ग्रॅम
२८ जून २०२२ – रुपये ५१,८४० प्रति १० ग्रॅम
२९ जून २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२७ जून २०२२- रुपये ६१,१५० प्रति किलो
२८ जून २०२२ – रुपये ६१,३५० प्रति किलो
२९ जून मे २०२२- रुपये ६०,९३० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.