⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर.. सणासुदीत सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण ; पहा प्रति ग्रॅमचा दर

खुशखबर.. सणासुदीत सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण ; पहा प्रति ग्रॅमचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । सध्या देशात सणासुदीचे दिवस सुरु झाले असून या दरम्यान तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या आठवड्यात देखील सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. सोबतच चांदीही घसरली आहे. मागील काही सत्रात झालेल्या घसरणीनंतर सध्या MCX वर सोन्याचा भाव ५१ हजाराखाली आला आहे. तर चांदी ५३ हजाराखाली आलीय. Gold Silver Rate Today

काल शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एमसीएक्स बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. त्यामुळे MCX वर सोन्याचा भाव ५०,३८४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आले. तो गेल्या आठवड्यात ५१,२३४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होता. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ५२,४७५ रुपयावर आली आहे. ती गेल्या आठवड्यात ५४,८१६ रुपयावर होती. म्हणजेच MCX वर या आठवड्यात सोन्याच्या भावात ८५० ते ९०० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी तब्बल २,३४१ रुपायाची घसरण झाली आहे.

जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सराफ बाजारात देखील दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५२,४०० रुपये इतका होता. तो सध्या ५१,०५० रुपायांवर आला आहे. म्हणजेच या आठवड्यात सोने १३५० रुपयाची मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्यात चांदीचा प्रति किलोचा दर ५६,६०० रुपयावर होता. ती सध्या ५३,५०० रुपयावर आली. म्हणजेच या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल ३१०० रुपयाची घसरण झाली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.