⁠ 
सोमवार, मे 6, 2024

सोने-चांदीत पुन्हा जोरदार घसरण ; खरेदीदारांना स्वस्तात खरेदीची संधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । अमेरिकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. मात्र याचे पडसाद सोने-चांदीच्या किमतीवर दिसून आले. मागील काही दिवसात दोन्ही धातूंमध्ये पडझड दिसून आली. Gold Silver Price Today

20 जुलैपर्यंत दोन्ही धातूमध्ये तेजीचे सत्र होते. 21 जुलैपासून भावात घसरण झाली. सोन्यात 1000 रुपयांची हजारांची तर चांदीत 2,000 रुपयांची घसरण झाली. आता दोन दिवस सोने-चांदीने पुन्हा उचल खाल्ली होती. सोने 500 रुपयांनी वधारले. तर चांदीने एक हजाराने झेप घेतली. 28 जुलै रोजी सोन्यात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली. तर चांदीत 2000 रुपयांची पडझड झाली.

24 कॅरेट सोने 59,491 रुपये, 23 कॅरेट 59,253 रुपये, 22 कॅरेट सोने 54,494 रुपये, 18 कॅरेट 44,618 रुपये, 14 कॅरेट सोने 34,802 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,420 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.