⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | जळगावात सोने पुन्हा 67 हजाराच्या घरात ; चांदी..; पहा आताचे भाव

जळगावात सोने पुन्हा 67 हजाराच्या घरात ; चांदी..; पहा आताचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून मात्र याच दरम्यान सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. सोन्याच्या किमतीत ग्राहकांना दिलासा मिळताना काही दिसत नाहीय.सोने पुन्हा एकदा चमकले आहे. जळगावमधील सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने पुन्हा ६७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मोठ्या उसळीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.

मागील गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळतेय. दुसरीकडे चांदीतही वाढ पाहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात २१ मार्च रोजी गुरुवारी सोन्याच्या किंमतींनी रेकॉर्ड केला होता. त्यावेळी जळगावात सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ६७३०० रुपयावर गेला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोनं ६६६०० रुपयांवर आले होते.

परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्यात पुन्हा वाढ होताना दिसून आली. सोमवारच्या सुट्टीनंतर मंगळवारी सोने ३०० रुपयांने तर बुधवारी २०० रुपयाची वाढ दिसून आली. यामुळे आज गुरुवारी सकाळच्या सत्रात जळगावच्या सुवर्णनगरीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ६७,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही चढउतार दिसून येत आहे. सध्या एक किलो चांदीचा दर ७५००० रुपये इतका आहे.

सोने दरवाढीचे कारण काय?
सोन्याच्या भावात अचानक एवढी वाढ का झाली ? तर याबाबत माहिती देतांना तज्ञांनी अमेरिकेतील एका घडामोडीचा उल्लेख केला आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. पण, व्याजदरात लवकरच कपात होईल असे संकेत बँकेकडून यावेळी प्राप्त झालेत. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या भावात अचानक उसळी पाहायला मिळाली. याचा परिणाम म्हणून सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.