जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । अमेरिकेसह G7 देशांनी रशियाकडून सोन्याच्या आयातीवर बंदी घातली असून, त्यानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा उच्चांक स्तरावर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीमध्ये भावात वाढ झाली आहे. आज मंगळवारी सोन्याच्या भावात किंचित ३० रुपयाची वाढ झाली आहे. सोन्याचा वायदा भाव पुन्हा एकदा ५२ हजारांच्या दिशेने जाताना दिसत आहे. दुसरीकडे चांदीच्या भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ३० रुपयाने तर चांदी २५० रुपयांनी महागली होती.
आजच्या दरवाढीनंतर जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,८४० रुपये इतका खाली आला. तर एक किलो चांदीचा भाव ६१,३५०रुपये इतका खाली आला आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. जी-७ देशांची शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेत काही देशांनी रशियातून सोने आयात करण्याबाबत नकार दिला आहे. सोने आयतीवर बंदी घातल्याने जागतिक बाजारात सोन्याचा भाव वधारला असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले.
यापूर्वी सलग दोन आठवडे सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या भावात एक हजाराहून अधिकने घसरण झाली होती. तर चांदीच्या भावात तब्बल २५०० रुपयापर्यंतची घसरण झाली होती.
अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते