आज सोने महागले, तर चांदी स्वस्त ; जाणून घ्या जळगावातील नवे दर

मे 25, 2021 10:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । मागील गेल्या तीन चार दिवसापासून जळगावातील सुवर्णबाजारात सोने आणि चांदीचे भाव स्थिर होते. मात्र आज मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ नोंदविली गेली आहे तर चांदीच्या भावात घट झाली आहे. सोने प्रति ग्रम १० रुपयाने वाढले आहे. तर चांदीत आज ८०० रुपयाची घसरण झाली आहे.

gold

जळगावातील सराफ बाजारात मागील गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात तर ५ हजार रुपयापर्यंत महागले आहे. तर सोन्याच्या किंमतीत देखील काहीसा वाढ झाली आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९१७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,१७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६८३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,८३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदीच्या भावात घट झाली आहे. आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७५.०६ रुपये इतका असून १ किलोचा दर ७५.६०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now