जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात काही दिवसापूर्वी मोठी घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा सोन्याच्या (Gold Rate) दरात उसळी आली आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात दागिने महागल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे.
अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगाचा शेअर बाजार हादरून गेला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता सोने आणि चांदी (Silver Rate) अजून किती लंबी उडी मारणार याकडे खरेदीदारांचे लक्ष लागले आहे. जळगाव सुवर्ण नगरीत आज शुक्रवारी सोने महाग झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
आजचा जळगाव सुवर्णनगरीतील सोन्याचा दर
जळगाव सुवर्णनगरीत आज शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत जवळपास ५४,८०० इतकी आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,८०० रुपये इतका आहे. यापूर्वी गुरुवारी सकाळी सोने ५९,५०० रुपये प्रति तोळा इतका होता. तसेच गुडीपाडव्याच्या दिवशी सकाळी सोन्याचा दर ५८,४०० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच गेल्या दोन दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल १४०० रुपयाची वाढ झालेली आहे. येत्या काळात सोने ६५,००० रुपयांचा विक्रम करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहे.
आजचा चांदीचा दर
दुसरीकडे आज चांदीचा एक किलोचा दर ७०,००० रुपये इतका आहे. यापूर्वी काल गुरुवारी सकाळी चांदीचा दर ६९,८०० रुपये इतका आहे.पाडव्याला चांदीचा दर ६९,००० रुपये इतका होता. त्यात दोन दिवसात १००० रुपयाची वाढ झाली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याचा भाव १०० रुपयांनी घसरून ५९,४६२ रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भावही किंचित ३२ रुपयांनी वाढला असून यामुळे चांदी ७०,२४४ रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.