⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोने ९५० रुपयांनी तर चांदी २३०० रुपयांनी वधारली ; खरेदीपूर्वी नवीन दर तपासून घ्या..

सोने ९५० रुपयांनी तर चांदी २३०० रुपयांनी वधारली ; खरेदीपूर्वी नवीन दर तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२३ । सोन्याच्या दरात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेजी आली होती. तशीच तेजी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाली होती. या आठवड्यात दोन्ही धातूंनी माघार घेतली नाही. जळगाव सुवर्णनगरीत या आठवड्यात सोने ९५० रुपयांनी तर चांदी २३०० रुपयांनी वधारली.

एन लग्नसराईत दोन्ही धातूंच्या किमती महागल्या आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचा खिसा खाली करावा लागतोय. नोव्हेंबर महिन्यात ६२ हजारांच्या घरात असलेल्या सोन्याचे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ९०० रुपयांनी वाढून ६५ हजार ९६ रुपये प्रति तोळा झाले होते.

४ डिसेंबर रोजी ते ६६,२२९ रुपयांवर पोहोचले होते. दुसऱ्याच दिवशी १३०० रुपयांची घसरण होऊन दर ६४,८९० रुपये झाले होते. ही घसरण चालूच राहत गत पंधरवड्यात दर ६२ हजारांवर होते. त्यात २३ डिसेंबरला पुन्हा ३५० रुपयांची वाढ होऊन तीन टक्के जीएसटीसह दर ६५, २५० रुपये झाले. तर विनाजीएसटी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६३,३५० रुपये इतका आहे.

चांदीचा दर :
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या आठवड्यात चांदी ३५०० रुपयांनी महागली होती. तर या आठवड्यात चांदीच्या किंमतीत २३०० रुपयांची भर पडली. दोन आठवड्यात एकूण ५८०० रुपयांनी भाव वाढला. सध्या एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी ७५००० रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.