⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोने पुन्हा घसरले, चांदीही झाली स्वस्त, त्वरित जाणून घ्या आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दोन्ही मौल्यवान धातू लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. सोन्याचा भाव अजूनही 52 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या खाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने  व्याजदरात वाढ केलेली आहे आणि पुढील महिन्यात त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात (Repo Rate) वाढ केलेली असून महागाई अटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक पुन्हा दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येण्याची शक्यता आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सोन्याचा भाव घसरून ५१,४०७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आले. तर चांदीचा एक किलोचा भाव ५५,१७८ रुपयांवर आले आहे. दरम्यान,उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या घसरणीनंतर जळगावमध्ये सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ४७,५८० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५१,९४० रुपये इतका आहे. तर सध्या चांदीचा भाव ५६,१५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, आठवडाभरात साेने ५०० रुपयांनी तर चांदी ३२५० रुपये घसरली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,250 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,550 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 552 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.