जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२३ । देशात लग्नसराई सुरु असून यादरम्यान सोने आणि चांदीच्या किमतीला मोठी मागणी असते. अशात सोने प्रचंड वाढले आहे. २ फेब्रुवारी २०२३ ला सोन्याने सार्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर घसरण दिसून आलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज पुन्हा सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आलीय. आज सोने ०.२८ टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे सोने ५६ हजाराखाली आले आहे.सोबतच आज चांदी ०.३५ टक्क्यांनी घसरली आहे. Gold Silver Rate Today
MCX वरील आजचा दर?
MCX वर आज सकाळी १२.०० वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित १६० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने ५५,९२५ रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत २३१ रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर ६५,२०७ रुपयावर व्यवहार करत आहे. तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी असू शकते.
जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ५१,५०० ते ५१,६०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ५६,४०० ते ५६, ५०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६६,६०० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
दरम्यान, सोने त्याच्या सार्वकालीन उच्चांक दरापासून २८०० रुपयांहून अधिकने स्वस्त मिळत आहे. यापूर्वी सोने २ फेब्रुवारी २०२३ रोजी ५८,८०० रुपये प्रति तोळा इतका होता.
ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.