⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, लगेचच तपासा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । सोने आणि चांदीचे (Gold Silver Rate) दर एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. गेल्या काही दिवसापासून ६० हजाराच्या आत आहे. तर चांदीचा दर ७३ हजाराच्या आत विकले जात आहे. दरम्यान, आज गुरुवारी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून आलीय. Gold Silver Rate Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 0.60 टक्क्यांनी म्हणजे 359.00 रुपयांनी घसरला आणि 59,046 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीची किंमत 1.24 टक्क्यांनी म्हणजेच 905 रुपयांनी घसरला आहे यामुळे चांदीचा एका किलोचा दर 72,325 रुपये झाली आहे.

जळगावातील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,650 रुपये प्रति दहा ग्रॅम आह. 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 72,500 रुपये प्रति किलोवर विकला जात आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.