---Advertisement---
वाणिज्य

खुशखबर! अधिक मास संपताच सोनं झाले स्वस्त ; दर सव्वा महिन्याच्या नीच्चांकीवर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२३ । सोने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ५९ ते ६० हजारांदरम्यान असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते सव्वा महिन्याच्या नीचांकीवर आले आहे. अधिक मासामुळे सोने- चांदीच्या भावात वाढ झाली होती. आता तीन दिवसांपासून सोने ५८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर (१० ग्रॅम) असून, चांदीतही चढ-उतार होतआहे. सध्या चांदी ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर आहे.

gold silver 1 jpg webp webp

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते ५९ हजारांच्या पुढे होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने भाववाढ तर होतच होती, शिवाय अधिक मास सुरू झाल्याने सोने-चांदीला मागणी वाढली होती. त्यामुळे मध्यंतरी सोने ६० हजारांच्याही पुढे गेले. मात्र दिवसांपासून ते ५८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहे.

---Advertisement---

गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी ५८ हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर असलेल्या सोन्याचे भाव अधिक मास सुरू झाल्यानंतर वाढू लागले. १३ जुलै रोजी सोने ५९ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर ते पुन्हा १९ जुलै रोजी ६० हजार २५० रुपयांवर पोहोचले. अशाच प्रकारे किरकोळ चढ-उतार सुरू राहत सोन्याचे भाव ५९ हजार रुपयांच्या पुढे राहिले. मात्र, १६ ऑगस्ट रोजी ५९ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात अधिक मास संपताच १७ ऑगस्ट रोजी ५०० रुपयांची घसरण झाली व ते ५८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर आले.

१६ ऑगस्ट रोजी ७० हजार ६०० रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात १७ ऑगस्ट रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ती ७० हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली. त्यानंतर १८ रोजी मात्र एक हजार रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. १९ रोजी त्यात पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---