⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदीच्या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले, आजचा 10 ग्रॅमचा दर पहा..

सोने-चांदीच्या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले, आजचा 10 ग्रॅमचा दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । देशभर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून ऐन लग्नाच्या हंगामात सोन्यासह चांदीच्या किमतींनी मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.विशेष म्हणजे दिवाळीपासून सोन्याने दरवाढ नोंदवली असून या आठवड्यात आतापर्यंतचे रेकॉर्डच मोडले. Gold Silver Rate Today

येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात 4 मे 2023 रोजीचा, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपयांचा रेकॉर्ड इतिहास जमा झाला. तर बुधवारी किंमती 62,629 रुपयांवर होत्या. शुक्रवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,728 रुपये झाला. तर चांदी 76,400 रुपये किलो होती.

सोन्याचा दर
दिवाळीपासून दरवाढीचे सत्र सुरुच आहे. त्याला किंचित ब्रेक लागला. या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे रेकॉर्डच मोडले नाही तर नवीन विक्रम पण केले. या आठवड्यात सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. 30 नोव्हेंबर रोजी भावात 650 रुपयांची घसरण झाली. तर 1 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा दर
गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी महाग झाली. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. 1 डिसेंबर रोजी 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.