⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Today : सोने घसरले, मात्र चांदी 1300 रुपयांनी महागली

Gold Silver Today : सोने घसरले, मात्र चांदी 1300 रुपयांनी महागली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२३ । लग्नसराईमुळे लोक सोने-चांदी खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जळगावात सरलेल्या पंधरवड्यात सोने दरात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदी किमतीत मोठी वाढ झाली आहे.

सरलेल्या पंधरवड्यात सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वधारले. सोने दरात ८०० रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात १३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. १ जून रोजी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ६०,६०० रुपये होते. ५ आणि १२ जून रोजी ते ६० हजारांवर पोहोचले. त्यानंतर घसरण होऊन ५९,३५० पर्यंत (दि. १५) खाली गेले. सरलेल्या आठवड्यातील शनिवारी ५९,८०० रुपये झाले.

म्हणजेच ८०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. चांदी १ जून रोजी ७२,२०० रुपये किलो होती. त्यात वाढ होत जाऊन ती १० जूनला सर्वाधिक ७४,५०० रुपये झाली. त्यानंतर पुन्हा घसरण होऊन शनिवारी दर ७३,५०० रुपयांवर पोहोचले. म्हणजे चांदीच्या दरात या काळात १३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत किंचित 10 रुपयांनी घसरली असून यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 59,346 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 160 रुपयांनी वाढला असून यामुळे एक किलो चांदीचा दर 72,856 रुपयांवर व्यवहार करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.