जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । एप्रिलनंतर जुलै महिन्यात सोने (Gold Rate) आणि चांदीने (Silver Rate) ग्राहकांचा घाम काढला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात दोन्ही धातूंनी दिलासा देण्याचे काम केलं आहे. मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या ताबडतोब चढाईने सोने-चांदीला या महिन्यात अजूनपर्यंत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. सराफ बाजारात सोन्याचा दर 58 हजाराच्या घरात आहे. तर चांदीचा दर 70 हजारावर विकला जात आहे.
काय आहे आजचा दर
22 कॅरेट सोने 54,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. दरम्यान, आज शनिवार आणि उद्या रविवार सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.
आठवड्यात झाली इतकी घसरण
या आठवड्यात सुट्यांमुळे एक दिवस भाव जाहीर झाला नाही. तर सोन्याला या आठवड्यात खासा कामगिरी करता आली नाही. सोन्यात पुन्हा पडझड झाली. 550 रुपयांची घसरण झाली.
चांदीचा दर
ऑगस्ट महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला होता. भाव 200 रुपयांनी वाढले होते. तर काल 18 ऑगस्ट रोजी चांदीने जवळपास 500 रुपयांपेक्षा वाढ झाली. यामुळे चांदीने पुन्हा 70 हजारांचा टप्पा ओलांडला आहे, सध्या एक किलो चांदीचा भाव 71000 रुपयापर्यंत आहे.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 53900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,900 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 71,200 रुपये इतका आहे.