---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

दिलासा ! सोन्या-चांदीचा भाव पुन्हा घसरला, पाहा आजचा नवीन दर?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२३ । परदेशी बाजारातून मिळणाऱ्या कमकुवत संकेतांमुळे सोन्या-चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे. MCX वर सोन्याचा भाव किंचित घसरणीसह 60500 रुपयांच्या खाली घसरला आहे. तर चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. एमसीएक्स चांदीची किंमत 75, 286 रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी दोन्ही दरांमध्ये जोरदार वाढ झालेली दिसून येत होती. पण डॉलर आणि उत्पन्नातील मजबूतीमुळे किमतींवर दबाव येत आहे. Gold Silver Rate Today

gold silver 2 jpg webp webp

मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच लग्नसराई व अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वसामन्यांसाठी सोने खरेदी करणे कठीणच झाले आहे. परंतु, आता मागील दोन तीन दिवसापासून दोन्ही धांतूंच्या किमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

---Advertisement---

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,840 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,910 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 774 रूपये आहे.

जळगावातील सोने-चांदीचा दर?
जळगावात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,800 रुपयापर्यंत आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 75,800 रुपये प्रति किलो इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस $2015 वर व्यापार करत आहे. कोमॅक्सवर चांदी 25.25 डॉलर प्रति औंसवर घसरली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---