रविवार, डिसेंबर 10, 2023

पंधरा दिवसात सोने-चांदीने घेतली मोठी झेप ; पहा किती रुपयांनी वधारले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । जुलै महिन्याच्या पंधरवाडामध्ये सोने (Gold Rate Today) आणि चांदी (Silver Rate) पुन्हा वरच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. यामुळे आता दोन्ही धातूंच्या किमती कुठवर जातात याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र किंमतीत मोठी दरवाढ झालेली नसून डॉलर निच्चांकावर आल्याने सोने-चांदीच्या किंमती वधारल्या होत्या. दरम्यान घसरणीनंतर आज आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीचा दर वधारला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत १४४ रुपयांनी वाढून ५९,२८० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर २०८ रुपयांनी वधारला आहे. यामुळे एक किलो चांदीचा दर ७५,७७५ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५४,६५० रुपये इतका आहे. यापूर्वी काल सकाळी २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५०० रुपयावर होता. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५९,६४० रुपयापर्यंत पोहोचला आहे. यातही किंचित वाढ झालेली दिसून येतेय. दरम्यान चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७५,७०० रुपयावर विकला जात आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात सोने-चांदीने जोरदार उसळी घेतली. या पंधरवाड्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. या पंधरा दिवसात सोने जवळपास १३०० ते १५०० रुपयांनी वधारले. तर चांदीने ५००० ते ५५०० हजार रुपयांची झेप घेतली.