जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । सध्या लॉकडाऊनमुळे सोने चांदी बाजारात मंदीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून भाव जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारात देखील सध्या मंदी असल्याने आगामी काही दिवसात सोने चांदीचे दर उसळी मारण्याची चिन्हे दिसून येत आहे.
२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम दर ४,७५४ रुपये तर १० ग्रामसाठी ४७,५४० रुपये इतका आहे. कालपेक्षा आज प्रति ग्राम फक्त १ रुपयांचा फरक आहे.
२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम दर ४,५२८ रुपये इतका असून १० ग्रामसाठी ४५,२८० रुपये इतका असून यात देखील प्रति ग्राम १ रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याप्रमाणे चांदीच्या भावात देखील काहीच बदल नसून कालप्रमाणे आज देखील १ किलो चांदी ७३,४०० रुपयांना मिळत असून प्रति ग्राम दर ७३.४ रुपये इतका आहे.