सोनं-चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ; पुन्हा मोठी वाढ होणार! पहा नवे दर..

मे 17, 2023 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । जागतिक बाजारात अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम सोने-चांदी (Gold Silver Price) किमतीवर दिसून आला आहे. ऐन लग्नसराईमध्ये सोन्याचा दर ६१ हजारावर गेला आहे. तर चांदीचा दर तर आवाक्याबाहेर गेला आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सुरुवातीपासूनच सोन्यासह चांदी हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आज दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी १० वाजेपर्यंत सोन्याचा भाव ११९ रुपयांनी वाढला असून त्यामुळे प्रति तोळ्याचा सोन्याचा दर ६०,३६३ रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत किंचित ५० रुपयाची घसरण झाल्यानंतर चांदीचा एक किलो दर ७२,६३० रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,५०० रुपये (विंजिनेस्टी) इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७३,००० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. सोने-चांदीचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे.

गेल्या दहा दिवसापूर्वी सराफ बाजारात चांदीचा प्रति किलोचा दर 77300 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. त्यात आतापर्यंत जवळपास 4300 रुपयापर्यंतची मोठी घसरण झाली आहे. मात्र, दुसरीकडे सोन्याच्या किमतीत फारसा बदल झालेला दिसत नाहीय. मात्र येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. तसेच चांदी देखील लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now