सोने ६ महिन्याच्या नीचांकी पातळीवर ; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा प्रति तोळ्याचा भाव

सप्टेंबर 16, 2022 11:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । सोन्याच्या (Gold Price) किमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली असून त्याची किंमत ६ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. आजच्या झालेल्या घसरणीनंतर सोने 50 हजाराखाली आले आहे. सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर ही घसरण झाली आहे. दुसरीडे आज सकाळी चांदीच्या (Silver Rate) दरातही घसरण पाहायला मिळत आहे. अशात जर तुम्ही दागिने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. Gold Silver Price Today

gold silver 1 1 jpg webp

MCX वरील आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज सकाळी 11 वाजेल शुक्रवारी, MCX वर 24 कॅरेट सोने 110 रुपयांनी घसरून 49,205 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 202 रुपयांनी घसरून 56,215 रुपयावर व्यवहार करतोय. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात मागील काही सत्रात सोन्याच्या भावात घसरण दिसून आलीय. शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,400 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,600 रुपये इतका आहे. यापूर्वी गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,500 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,700 रुपये इतका आहे. तर सोमवारी सोने 51,400 तर मंगळवारी 51,150 रुपये तर बुधवारी 51,200 रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या तीन ते चार दिवसात सोने जवळपास 700 ते 750 रुपयांनी घसरले आहे. तर आज चांदीचा प्रति किलोचा दर जवळपास 59,900 हजाराच्या आसपास आहे. यापूर्वी चांदी सोमवारी 56,500 रुपयांवर, मंगळवारी 56,650 रुपये तर बुधवारी 57,800 व गुरुवारी 57,000 इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

पितृपक्षात कमी व्यवसाय
दरम्यान, हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीत १६ दिवसांचा पितृ पक्ष पंधरवडा मानला जातो. या काळात सर्व प्रकारचे मांगलिक, वैवाहिक आणि इतर शुभ कार्ये केली जात नाहीत. पितृ पक्षाचा प्रभाव काही व्यवसायांवर जास्त तर काहींवर कमी झाला आहे. सोन्या-चांदीच्या व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now