जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । अमेरिकेतील घडामोडींचा भारतीय सराफ बाजारात परिणाम दिसून येतोय. मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतलीय. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 58 हजारांवर गेलेला सोन्याचा (Gold Rate) दर गेल्या आठवड्यात 55 हजाराच्या घरात आला होता. मात्र आता पुन्हा 58 हजारावर गेला आहे. सोन्याचा झपाटा पाहता हा भाव 60,000 रुपयांवर जातो की काय, अशा चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सोन्यासह चांदीच्या (Silver Rate) किमतीत पुन्हा वाढ झालेली आहे. चला जाणून घेऊयात काय आहे आजचा प्रति तोळ्याचा भाव? Gold Silver Rate Today
जळगावातील सोन्याचा दर
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचं किमतीत पुन्हा वाढ झालेली दिसून येतेय. आज गुरुवारी सकाळी 22 कॅरेट सोन्याचा दर 53000 हजारांवर गेला आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58000 हजारापर्यंत गेला आहे. यापूर्वी बुधवारी सकाळी सोन्याचा दर 57,900 रुपायावर होता. त्यात आता 100 रुपयांहून अधिकची वाढ दिसून येतेय. दरम्यान, सोमवारी सोन्याचा दर 57,200 होता. तर मंगळवारी 57,800, बुधवारी 57,900 प्रति 10 ग्रॅम इतका होता.
चांदीचा दर
काल सकाळी स्थिर असलेला चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज चांदीचा प्रति किलोचा दर 68,000 हजारांवर गेला आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी चांदीचा दर 66,800 रुपयावर विकला जात होता. मात्र त्यात एकाच दिवसात तब्बल 1200 रुपयांहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.
दरम्यान, चार दिवसापूर्वी चांदीचा दर जवळपास 64,200 रुपये प्रति किलो इतका होता. मात्र आतापर्यंत त्यात तब्बल 3800 रुपयांची वाढ झालेली दिसून येतेय. ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याचे दिसून येतेय. MCX वर आज सकाळी सोन्याच्या दर 433 घसरून 57,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 358 घसरून 66,941रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
सोने चांदीची किंमत कशी ठरवली जाते?
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.