जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । . ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना मोठा झटका बसला होता. मात्र, सततच्या वाढीनंतर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. घसरण झाली असली तरी सोन्याचे भाव अजूनही 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहेत.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांपर्यंतची (विनाजीएसटी) घट झाली आहे. 5 मे 2023 रोजी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, सोन्याचा भाव 62000 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. Gold Silver Rate Today
दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 5 मे 2023 रोजी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 77500 रुपयापर्यंत (विनाजीएसटी) इतका होता. त्यात आतापर्यंत 3000 रुपयांहून अधिकची घसरण झालेली दिसून येत आहे.
जळगावातील आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,400 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर 61,500 रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 73000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. सोने-चांदीचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आज दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 60,876 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदी 73,059 रुपयावर व्यवकर करत आहे.
अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.