सोमवार, डिसेंबर 11, 2023

चांदीच्या किमतीने गाठला पुन्हा मोठा टप्पा ; सोनेही वधारले.. आताचे ताजे दर तपासून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । अमेरिकन डॉलर (Dollar) वर्षभराच्या निच्चांकावर पोहचल्याने सोने-चांदीने आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा मांड ठोकली आहे. या आठवड्यात सोने-चांदीने तुफान बॅटिंग केली. मे आणि जूनमध्ये घसरण झालेल्या दोन्ही धातूंच्या किंमती पुन्हा उच्चांकाकडे धाव घेत आहेत.

फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सोन्यासह चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीने मोठी उसळी घेतली. त्यावेळीस सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 62000 रुपयावर गेला होता तर चांदीचा दर 77000 हजार रुपयांवर गेला होता. यामुळे ऐन लग्नसराईत झालेल्या वाढीने ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्याने दिलासा मिळाला होता. सोन्याचा दर 58 हजारावर तर चांदीचा दर 70 हजारापर्यंत खाली आला होता. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीने मोठी उसळी घसरली आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 54,600 रुपये. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 60000 रुपयापर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 76000 रुपयावर पोहोचला आहे.

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याचा दर विनाजीएसटी 59,100 रुपयापर्यंत होता. त्यात आतापर्यंत 900 ते 1000 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीने गेल्या पाच दिवसात मोठी उसळी घेतली आहे. सोमवारी (10 जुलै) चांदीचा दर सकाळच्या सत्रात विनाजीएसटी 70,600 रुपयावर होता. तो आता विनाजीएसटी 76000 रुपयावर गेला आहे. म्हणजेच गेल्या पाच ते सहा दिवसात चांदीचा दर तब्बल 5000 ते 5500 रुपयापर्यंतची वाढ झालेली दिसून येतेय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,334 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. याशिवाय चांदीचा भाव 75,990 रुपये प्रति किलोच्या पातळीवर गेला आहे.