आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी महागली, त्वरित तपासा नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । दिवाळी सण होताच लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या काळात सोने आणि चांदीला मोठी मागणी असते. मात्र लग्नसराईमध्ये सोन्यासह चांदीचे दर वाढताना दिसून येत आहे. भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यवहारात 0.06 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. त्याच वेळी, आज एमसीएक्सवर चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी वेगाने बोलला जात आहे. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा सोने चांदीचा भाव?
आज सोमवारी, वायदे बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 10.15 वाजता 181 रुपयांनी वाढून 52,515 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा भाव आज रु.52,318 वर उघडला होता. मात्र त्यांनतर किमतीत वाढ दिसून आलीय. दरम्यान, दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीही महागली आहे. आज चांदीचा दर 270 रुपयांनी वाढून 61,841 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात सोने चांदी महागली
भारतीय सराफा बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली. चांदीही महाग झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गेल्या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (7 ते 11 नोव्हेंबर) म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,958 होता, जो वाढून 52,281 रुपये झाला. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत 60,245 रुपयांवरून 61,354 रुपये प्रति किलो झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दिवाळीत सुवर्णनगरीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,300 रुपये इतका होता. मात्र त्यानंतर वाढ होताना दिसून आलीय. आज सकाळी 22 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा भाव 48 हजारावर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 52,500 रुपये इतका आहे. दुसरीकडे जळगावमध्ये चांदीच्या किमतीने 62 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)