⁠ 
बुधवार, मे 8, 2024

ग्राहकांना पुन्हा झटका! आज सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2800 रुपयांहून अधिकने महागली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२३ । सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी झटका देणारी बातमी आहे. कारण आज MCX वर सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झालेली पाहायला मिळतेय. यामुळे सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उच्चांक गाठला. देशांतर्गत बाजाराबरोबरच परदेशी बाजारांमध्येही विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate 14 December 2023

MCX वरील सोने चांदीचा दर
आज गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1,261 रुपयांनी वाढून 62,460 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भावही सुमारे 4 टक्क्यांनी मजबूत झाला. म्हणजेच दरात 2,824 रुपयांची वाढ होऊन दर 74,356 रुपये किलोवर पोहोचला आहे.

दरम्यान, देशात सणोत्सवानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीची मागणी वाढली ज्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळाली आहे. जळगाव सराफ बाजारात ४ डिसेंबर २०२३ रोजी सराफ बाजारात सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली. सोबतच चांदीच्या किमतीने देखील नवा विक्रम केला. त्यावेळी सोन्याचा दर विनाजीएसटी ६४ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तर जीएसटीसह सोन्याचा दर ६६३०० रुपयांवर गेला होता. तर चांदीचा एक किलोचा दर जीएसटीसह ८०,३४० गेला होता.

मात्र गेल्या आठवड्यात दोन्ही दरात दिलासा मिळाला होता. बुधवारी सायंकाळच्या सत्रात सोन्याचा विनाजीएसटी दर ६२००० हजार रुपयावर आला तर चांदीचा दर विनाजीएसटी ७२००० रुपयापर्यंत घसरला होता. मात्र आज MCX वर झालेल्या दरवाढीने सोन्याचा दर पुन्हा ६४००० हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.