जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीने रेकॉर्ड ब्रेक केले. ऐन लग्नसराईत किंमती गगनाला भिडल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. गेल्या दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी तर चांदीत 2300 रुपयांनी उसळली घेतली. यामुळे सोन्याच्या किंमतींनी 66,000 चा टप्पा ओलांडला तर चांदीने 75 हजारांच्या पुढे आगेकूच केली. Gold Silver Rate 13 March 2024
जानेवारी आणि फेब्रुवारीत किंमतीत चढउतार झाला. पण नवीन रेकॉर्ड करता आला नाही. दोन्ही धातूंनी ही कसर मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांतच भरुन काढली. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पण सोने महागले. या आठवड्यात सोन्याने उसंत घेतली. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,880 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 500 रुपयांनी वधारली
मार्च महिन्यात चांदी जवळपास 3 हजारांनी महागली. गेल्या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली होती. तर 12 मार्च रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 76,100 रुपये आहे.