---Advertisement---
जळगाव शहर वाणिज्य सोने - चांदीचा भाव

आज सोने-चांदीच्या किमतीत झाली मोठी वाढ ; जळगावात सोन्याने ओलांडला 57 हजाराचा टप्पा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२३ । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना आज जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज सोमवारी बाजाराच्या सुरुवातीलाच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11.30 वाजेपर्यंत सोन्याच्या दर 330 रुपयांनी वाढला तर दुसरीकडे चांदी तब्बल 615 रुपयांनी वधारला आहे. सोबतच दरवाढीमुळे जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 57000 रुपयावर गेला आहे. Gold Silver Rate

gold silver jpg webp webp

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11.30 वाजेपर्यंत सोन्याच्या दर 56,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 63,505 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

---Advertisement---

जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 55 हजारावर आला होता. मात्र गेल्या तीन दिवसात त्यात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 57,200 रुपयावर गेला आहे. गेल्या आठवड्यात सोने जवळपास 150 रुपयांनी महागले असल्याचे दिसून आले.

तर दुसरीकडे चांदी 64,200 रुपये प्रति किलो इतका आहे. मागील आठवड्यात चांदीच्या किमतीत जवळपास 3000 हजार रुपयांची घसरण दिसून आलीय. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

दरम्यान गेल्या महिन्यातील 2 फेब्रुवारीला जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 58,300 विना जीएसटीसह (GST सह जवळपास 59000) विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर घसरण दिसून आली होती, परंतु आता सोने पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---