दिवाळीपूर्वी सोने – चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आज पुन्हा घसरले भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण सुरु आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात त्याचा परिणाम दिसून येतोय. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर ही चांगली संधी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 10 वाजेला सोन्याच्या भावात 200 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. तर चांदी तब्बल 700 रुपयांहून अधिकने घसरली आहे. गेल्या तीन दिवसात सकाळच्या सत्रात चांदीच्या भावात जवळपास साडे तीन ते चार हजार रुपयाची घसरण झाली आहे. Gold Silver Rate Today
MCX वर आजचा सोने चांदीचा भाव?
आज बुधवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 10 वाजता 236 रुपयांनी घसरून 50,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज पुन्हा चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या किमतीत 765 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा एक किलोचा भाव ५७,७७० रुपयावर व्यवहार करत आहे.
जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदी वधारली?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,000 रुपये इतका आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,200 रुपये इतका आहे. सध्या चांदीचा भाव 59,000 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.