⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | या आठवड्यात चांदी 3000 रुपयांनी घसरली, सोने.. ; पहा आजचा 10 ग्रॅमचा दर

या आठवड्यात चांदी 3000 रुपयांनी घसरली, सोने.. ; पहा आजचा 10 ग्रॅमचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२३ । ऐन लग्नसराईत सोन्याच्या (Gold Rate) किमतीत वाढ झालेली दिसून आली. जळगाव सुवर्णनगरीत शुक्रवारी सायंकाळपर्यंत सोन्याचा दर 56 हजाराखाली होता. मात्र त्यात एकाच दिवसात 1300 रुपयांहून अधिकची वाढ झालेली दिसून आली. या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात किंचित वाढ झालेली दिसून येतेय. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालीय. Gold Silver Rate

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जवळपास 56550 रुपयापर्यंत होता. त्यात शुक्रवारपर्यंत घसरण दिसून आली होती. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. मात्र शनिवारी बाजार खुलताच त्यात 1300 रुपयांची वाढ होऊन तो 56600 गेला. आज सोने अंदाजित 56700 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. म्हणजेच या आठवड्यात सोन्याचा किमतीत किंचित 150 रुपयाची वाढ दिसून येतेय.

मात्र, दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून येतेय. सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर 67000 पर्यंत होता. तो सध्या 64000 हजार रुपयांवर आला आहे. म्हणजेच या आठवड्यात चांदीच्या किमतीत जवळपास 3000 हजार रुपयांची घसरण दिसून येतेय.

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

किंमती चढउतार
2022 मध्ये सोन्याच्या किमतींमध्ये बरीच अस्थिरता होती. रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर भारतात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. पण दिवाळीनंतर पुन्हा एकदा भावात झपाट्याने वाढ झाली आणि 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडा पार केला. मात्र आता तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीत वाढ होण्याची आशा नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.