जळगाव जिल्हा

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन इको फ्रेंडली होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाविद्यालयाच्या आवारातील झाडांची पाने गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला या सुकलेल्या पानांची होळी का दहन करण्यात आले.

godvari holi

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी होळीचे पूजन करून होळी पेटवण्यात आली यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी आपण पारंपारिक रित्या ओळीचे दहन करत असतो महर्षी कर्वे संत गाडगेबाबा नेहमी म्हणत असत आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा जेणेकरून रोगराई पसरणार नाही युवा पिढीने सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे व होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी कोरड्या रंगाचा वापर करून होळी खेळली तसेच पाण्याचा वापर न करता कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण पूरक पद्धतीने सण साजरे केल्यास निसर्गाचे नुकसान टाळता येते आणि आरोग्यालाही धोका कमी होतो असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button