⁠ 
सोमवार, मे 6, 2024

ग्राहकांना झटका! सोने-चांदी पुन्हा सुसाट, प्रति तोळ्याचा दर कुठपर्यंत गेला?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२३ । अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह महागाई आटोक्यात येण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत असून या घडामोडींचा सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांत स्थानिक बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उलथापालथ झालेली नाही. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी देखील सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. Gold Silver Price Today

फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली होती. मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 62000 रुपयावर तर चांदीचा दर 77000 रुपयांवर गेला होता. मात्र मे महिन्याच्या पंधरवडापासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने सोने 58000 तर चांदी 69000 पर्यंत खाली होती होती.

परंतु सोने-चांदीला जुलै महिना पावला म्हणायचा, कारण या महिन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंनी जोरदार मुसंडी मारली. दोन्ही धातूंच्या किंमती चांगल्याच वधारल्या. जळगाव सुवर्ण नगरीमध्ये गेल्या आठवड्यातील बुधवारी सोन्याचा भाव विनाजीएसटी 58500 रुपयापर्यंत होता. तर चांदीचा दर 70500 रुपयापर्यंत होता. मात्र आता सोन्याच्या किमतीने 59 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीने देखील 72 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

आताचे नवीन दर काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 54,200 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 59,300 रुपयापर्यंत आहे. गेल्या सहा दिवसात सोने 700 ते 800 रुपयांनी महागले आहे. चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास जळगावात सध्या चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72,200 रुपयापर्यंत आहे. चांदीच्या किमतीत देखील गेल्या सहा दिवसात तब्बल 1500 ते 1700 रुपयापर्यंतची वाढ झालेली दिसून येतेय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील आजचा सोने-चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, आज बुधवारी सकाळी 10.30वाजेपर्यंत सोन्याचा भाव 100रुपयांनी वाढून 58,866 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 283 रुपयांनी वाढून तो 71,400 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.