जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या (Gold Silver Rate) भावात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत 200 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. त्यामुळे MCX वर सोने पुन्हा 51 हजारांच्या खाली आले आहे. तर दुसरीकडे चांदीचं किमतीत 600 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीतही मोठी घसरण झाली आहे. Gold Silver Price Today
MCX वर आजचा सोने चांदीचा भाव?
आज मंगळवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 11 वाजता 203 रुपयांनी घसरून 50 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज पुन्हा चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या किमतीत 602 रुपयांची घसरण झाली आहे. MCX वर दोन दिवसात सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात तब्बल 850 रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी 2 हजार रुपयांहून अधिकने स्वस्त झाली आहे.
जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदी वधारली?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. त्याचा देशांतर्गत बाजारात देखील परिणाम दिसून आला. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. आज मंगळवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,145 रुपये इतका आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,300 रुपये इतका आहे. यापूर्वी 24 कॅरेट सोन्याच्या भाव 52 हजारांवर होता. मात्र सोमवारी मोठी घसरण दिसून आली. सध्या चांदीचा भाव 60,000 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.सोन्याची स्पॉट किंमत 1.83 टक्क्यांनी घसरून $1,665.88 प्रति औंस झाली. सोन्याच्या दरात गेल्या अनेक सत्रांपासून घसरण सुरू आहे. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची किंमत आज ३.११ टक्क्यांनी घसरून १९.५१ डॉलर प्रति औंस झाली आहे. कालही चांदीचा भाव 1.86 टक्क्यांनी घसरला होता.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.